घरताज्या घडामोडीMaharashtra Board SSC Result: अभिनंदन! तब्बल ९५७ विद्यार्थ्यांची शंभर नंबरी कामगिरी

Maharashtra Board SSC Result: अभिनंदन! तब्बल ९५७ विद्यार्थ्यांची शंभर नंबरी कामगिरी

Subscribe

२७ विषयांत विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल हा ९९.९५ टक्के लागल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. दहावीच्या निकालात यंदा देखील मुलींनी बाजी मारील आहे तर ९५७ विद्यार्थ्यांनी शंभर नंबरी कामगिरी केली आहे. राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहे. www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. (Maharashtra Board SSC Result: Congratulations! hundred percent marks of 957 students)

कोरोनाच्या प्रादुर्भाव यंदा दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावी परीक्षांचे निकाल लावण्यात आले. महाराष्ट्र बोर्ड अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. दहावी बोर्डाने ७२ विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. ज्यात २७ विषयांत विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. खास म्हणजे यंदा देखील कोकणात १०० टक्के निकाल लागला असून नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी निकाल लागला आहे.

- Advertisement -

यंदा दहावी परीक्षांसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बोर्डाने यंदा सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. २७ विषयांत विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेत तर ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तर्णी झालेत तर २ लाख १८ हजार ७० विद्यार्थी दृतीय श्रेणीत आणि ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

दहावीची निकालाची वेबसाइट क्रॅश

दहावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या दोन अधिकृत वेबसाइट सुरु होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र १ वाजचा निकालासाठी वेबसाइट सुरूच झाली नाही. दहावी निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती दहावी बोर्डाकडून देण्यात आली असून हा तांत्रिक बिघाड असून वेबसाइट सुरुळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Board SSC Result: दहावी निकालाची वेबसाइट तांत्रिक कारणामुळे हँग, लवकरच सुरु होणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -