Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Maharashtra Board SSC Result: दहावी निकालाची वेबसाइट तांत्रिक कारणामुळे हँग, एका तासात...

Maharashtra Board SSC Result: दहावी निकालाची वेबसाइट तांत्रिक कारणामुळे हँग, एका तासात सुरु होणार

निकाल लागण्यासाठी आणखी एक तास लागणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले मात्र निकाल पाहण्यासाठी देण्यात आलेल्या result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsscboard.in या दोन्ही अधिकृत वेबसाइट साइट सुरु होत नसल्याने मागील ३० मिनिटांपासून विद्यार्थ्यांना दहावीचे निकाल कळू शकले नाहीत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकाल पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता होती. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. एकाच वेळी अनेकजण वेबसाइटवर विझिट केल्याने  वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने साइट हँग झाल्याची माहिती दहावी बोर्डाकडून देण्यात आली आहे. वेबसाइट पुन्हा सुरळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.  (Maharashtra Board SSC Result: Website of 10th result crashes, student parents annoyed)

निकाल लागण्यासाठी आणखी एक तास लागणार – बोर्ड 

दहावीचा निकाल लागण्यासाठी अजून १ तास लागणार असल्याची माहिती दहावी बोर्डाकडून देण्यात आली आहे. मागील दीड तासांपासून विद्यार्थी निकाल पाहण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पुढील एक तासात विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार असे सांगितले गेल्याने विद्यार्थ्यासह पालक आणि शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – SSC Result 2021 Maharashtra Board: यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

- Advertisement -