घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2022: राज्यातील 'या' 16 जिल्ह्यात महिला स्पेशल रुग्णालयाची स्थापना होणार,...

Maharashtra Budget 2022: राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यात महिला स्पेशल रुग्णालयाची स्थापना होणार, अजित पवारांची घोषणा

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प २०२२-२३ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या या अर्थसंकल्पात राज्य सरकारने आरोग्य सेवेसाठी ११ हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच आरोग्य विभागासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्यात १६ जिल्ह्यामध्ये प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय उभारण्यात येण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले की, ‘सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालयाची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाट्यांची स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येईल. अकोला आणि बीड येथे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम व श्रेणीवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षात राज्यात रुग्ण खाटांची क्षमता १ हजार २०० कोटींनी वाढून विशेष उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात ४९ रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती आणि इतर कामासाठी १ हजार ३९२ कोटी ११ लाख रुपये किंमतीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.’

- Advertisement -

पुढे पवारांनी सांगितले की, ‘देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तर नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे. शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.’


हेही वाचा – Maharashtra Budget 2022: कळसूत्री सरकारचा विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -