घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले?

शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले?

Subscribe

शिंदे सरकारने शेतकरी, महिला, यांच्यासह शिक्षकांनाही विशेष पॅकेज जाहीर केले आहे. यात मराठवाड्यासाठी विकासाच्या अनेक योजनांची घोषणाही झाल्या.

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कायम लोकप्रिय निर्णय आणि भरभरून घोषणा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शिंदे सरकारने शेतकरी, महिला, यांच्यासह शिक्षकांनाही विशेष पॅकेज जाहीर केले आहे. यात मराठवाड्यासाठी विकासाच्या अनेक योजनांची घोषणाही झाल्या. मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करून दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल २० हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचं देखील फडणवीस म्हणाले.

मराठवाडा हा कायम दुष्काळासाठी ओळखला जात असे. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी विहिरी खोदणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, कॅनॉलची देखभाल इत्यादी कामे होणे गरजेचे आहे. हा विचार करून छत्रपती संभाजीनगर, बी़ड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पासाठी तब्बल २० हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. या नदीजोड प्रकल्पातून दुष्काळी भागात पाणी आणण्यात येणार आहे. दमणगंगा-पिंजाळ असा एक नदीजोड प्रकल्प असणार आहे. नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणा र आहेत. मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरण्यात येणार आहे. मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला याचा भरपूर फायदा होणार आहे.

- Advertisement -

जलयुक्त शिवार ही यशस्वी योजना मागील सरकामध्ये सुरु केली होती. मात्र, ती योजना गेल्या काळात बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना २५ हजार गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे फडणीस यांनी जाहिर केले. या योजनेच्या माध्यातून राज्यातील अनेक धरणातली गाळ काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता, असल्याचेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून बीड (Beed) व लातूरसाठी तर धाराशिवसाठी उजणी धरणातून वॉटर ग्रीड निर्माण करण्याचे काम सुरु आहे. प्रगतीपथावरील २६८ सिंचन प्रकल्पापैकी या वर्षी ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील प्रगतीपथावरील २६८ सिंचन प्रकल्पापैकी या वर्षी ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. कोकणातील वाहून जाणारे पाणी, नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पास निधी उपसब्ध करुन दिला जाणार आहे. जलसंपदा विभागास १५ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करुण देण्यात येणार.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी भूजल पातळी वाढण्यास साहाय्यभूत ठरू शकणारा तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्प आणखी वेग धरणार आहे. कारण या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मेळघाटातील खारियाघुटी येथे धरण बांधले जाणार असून तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी कालव्यांच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, नेपानगर, खंडवा तसेच महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण केले जाणार आहे. दीड लाख शेतकऱ्यांना सौरकृषीपंप लावून दिले जाणार आहेत. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना २०२४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी निरा नदीतल्या उद्धट बोगद्यातून पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी उजनी धरणामध्ये सोडले जाणार आहे. त्यानंतर उजनी धरणातून पुढे सीना-कोळेगाव प्रकल्पात ग्रॅव्हीटीने पाणी येणार आहे. बोगद्याची कामे सुरु असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पाचीही कामे गतीने सुरू आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील १३३ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

पायाभूत सुविधा…समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग….
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
– पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)
(माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)
– या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ

रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
– सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
– 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी

विमानतळांचा विकास…
– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
– राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
– सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
– मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे
– ठाणे आणि कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालये/850 कोटी रुपये

पर्यटनाला चालना…
– प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास

सशक्त युवा….खेळांना प्रोत्साहन
– खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
– बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
– पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे…:
– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -