Maharashtra Budget Session 2022 Live Update : महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला

Maharashtra Budget Session 2022 Live Update
Maharashtra Budget Session 2022 Live Update

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला दाखल

ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या प्रश्नावर चर्चा


विधानसभा सभागृहाची बैठक संपली, सोमवारी सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजास सुरुवात होणार


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन कटिबद्ध

मराठी भाषा भवनासाठी १०० कोटी रुपये

नवी मुंबईतील ऐरोलीत मराठी भाषेचे उपकेंद्र यासाठी २५ कोटी रुपये

प्रत्येक जिल्ह्यात १ पुस्तकाचे गाव सुरु करण्यात येईल
मुक्ती संग्रामाची माहिती देण्यासाठी सर्व जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित यासाठी ७५ कोटी रुपये

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येणार


अजंठा वेरुळ महाबळेश्वसाठी विकास रचना तयार करण्यात येणार
लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर स्कायवॉक करणार
रायगड किल्ल्यासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार

गेट वे ऑफ इंडिया वास्तुवर महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभव दर्शवण्यासाठी मराठी आणि हिंदी ध्वनीतील चित्रफीत दाखवणार

कार्यक्रम खर्चासाठी पर्यटन विकासासाठी १ हजार ४६० कोटी
१८ अतिरिक्त न्यायालय , १४ कुटुंब न्यायालय, नवीन न्यायालयासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार
विधी व न्याय ५७८ कोटी


इलेक्ट्रॉनिक वाहनांची नोंदणी वाढ
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण राबवणार
१ लाखपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार

पर्यावरण पूरक ३ हजार बसेस सुरु करणार

एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार

कोरोना काळातील विधवांना उद्योग करण्यासाठी अनुदान देण्यात येणार

मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत ९८ गुंतवणूक करार
१ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित


रस्ते विकासासाठी १५ हजार ७७३ कोटी रुपये प्रस्तावित
वसई भायंदर जलमार्गाने जोडणार, खाडीचे खोलीकरण करण्यात येणार ३३० कोटी रुपये प्रस्तावित

ग्रामसडक योजनेंतर्गत ६ हजार ५५० किमीचे रस्ते उभारणार
समृद्धी महामार्ग गोंदिया आणि डचिरोलीपर्यंत वाढवणार

मुंबईतील मेट्रोचा कफ परेडपर्यंत विस्तार करणार
पुण्यात आणकी दोन मेट्रो मार्गांचा प्रस्ताव
शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प ७० टक्के पूर्ण

८ हजार ८४१ कोटी रुपये नगरविकास विभागाला

अमरावती विमानतळावर रात्रीचे उड्डाण करण्यासाठी नवीन टर्मिनल आणि धावपट्टी तयार करण्यात येत आहे.
गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्यावर विचार

 


ग्राम बाल विकासच्या धर्तीवर नागरी बाल विकास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

२ हजार ४७२ कोटी रुपये महिला व बाल कल्याण विकासाला देणार

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनांतर्गत ५ लाख घरांचे लक्ष्य आहे. त्यासाठी ६ हजार कोटींची तरतूद


शालेय विभागाला २ हजार ३५४ कोटी

तर क्रीडा विभागाला ३९५ कोटी रुपये

नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्र वापरण्यात येणार
राज्यातील तृतीयपंथियांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड देण्यात येणार


आरोग्य तपासणी मोहिम आपण राबवली, ६ कोटी ७८ लाख कोटी लोकांना दुसरा डोस
१५ लाखपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटी
मोतीबींदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा

प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार, ३ हजार १८३ कोटींचा निधी
८ कोटी रुपयांचे ८ मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात वाढ करण्याचा निर्णय
पदव्युत्तर अभ्यासक्रमात अधुनिक फिजियोथेरपी यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
पुणे शहरात ३०० एकर जागेत इंद्रायनी मेडिसीटी उभारणार यासाठी २ हजार ६१ कोटी रुपयांचा निधी

राज्यातील ५० खाटांपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या रुग्णालयांना धुलाई यंत्र देणार


उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर

पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात जुन्या इमारती आहेत. या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये

गोसेखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार

१ लाख हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे लक्ष्य

यंदा ११ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
जल विभागासाठी १३,२५२ कोटी रुपये

शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेसाठी ३ हजार कोटी रुपये
शेततळ्याच्या अनुदानाच्या रक्कमेत ५० टक्के वाढ ७५ हजार करणार

हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
संभाजीराजे महाराजांचे स्मारक हवेलीमध्ये उभारणार

कृषी विभागाला ३ हजार २५ कोटी रुपयांची तरतूद

कृषी आरोग्य मनुष्यबळविकास दळणवळण आणि उद्योग ही पंचसुत्री राज्याचा अर्थप्राण


अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात दाखल

राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार विधान भवनात मांडणार

सर्वसामान्य जनतेला काय दिलासा देणार

बजेटसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार


विधानसभेत विरोधकांकडून घोषणाबाजी

छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहे.


विधानसभा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात


विधान भवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे स्वागत

विधिमंडळाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फडणवीसांनी पुष्पहार अर्पण केला


Maharashtra Budget Session 2022 Live Update : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत मांडणार

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प मांडतील

अर्थसंकल्पात राज्यातील नागरिकांसाठी काय तरतूदी करण्यात आल्या आहेत. याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.