Maharashtra Budget Session 2022 Live Update : अमरनाथ राजुरकर हे गटनेतापदी – विधान परिषदेत काँग्रेस पक्षाची घोषणा

Maharashtra Budget Session 2022 Live Update
Maharashtra Budget Session 2022 Live Update

विधान परिषद सभागृहाचे कामकाज स्थगित


अमरनाथ राजुरकर – गटनेतापदी
अभिजित वंजारी – मुख्य प्रतोद

विधान परिषदेत कॉंग्रेस पक्षाकडून घोषणा


विधान परिषद सभागृहाचे कामकाज ३ वाजेपर्यंत स्थगित


एसटी कर्माचार्यांच्या संपावर त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींवर आर्थिक तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच कॕबिनेट घेण्याची विनंती करणार असल्याचे उत्तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत दिले.
त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजूरी गरजेची असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात


एसटी संप मुद्द्यावर विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब


विधान परिषदेचे कामकाज १२.४५ पर्यंत स्थगित


एफआरपीच्या मुद्द्यावरुन भाजपचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन


विधानसभा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात


ऊसाला एक रकमी भाव मिळण्यासाठी पडळकर, सदाभाऊ खोतांचे आंदोलन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही आंदोलन सहभागी

एफआरपीच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांचे विधान भवनाबाहेर आंदोलन

हातात ऊस घेऊन पडळकरांचे आंदोलन,

विधान भवनाबाहेर गेट क्र. १ बाहेर पडळकरांचे आदंलोन


कर्नाटक सीमावाद लवकर सोडवण्यासाठी विधिमंडळ सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. यासंदर्भात आज विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मांडण्याला आमची कोणतीही आडकाठी नसेल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले आहे.