घरBudget 2024Maharashtra Budget Session : बुलेट ट्रेनपेक्षा वंदे भारतला महत्त्व द्या, रोहित पवार...

Maharashtra Budget Session : बुलेट ट्रेनपेक्षा वंदे भारतला महत्त्व द्या, रोहित पवार असे का म्हणाले?

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (ता. 28 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. आज सत्ताधाऱ्यांनी मुंबईतील विकास कामांचा तर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या संबंधित आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रस्ताव 293 अंतर्गत मांडला. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला विरोध करत आपले मत व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर बोलत असताना बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. बुलेट ट्रेन आणायला काही हरकत नाही, परंतु, त्याचा संपूर्ण खर्च हा केंद्राने करावा, असे स्पष्ट मत रोहित पवारांकडून व्यक्त करण्यात आले. (Maharashtra Budget Session : Give importance to Vande Bharat over bullet train, why did Rohit Pawar say this?)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : एसआयटी चौकशीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी सरकारला घेरले

- Advertisement -

विधानसभेत आमदार रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा बुलेट ट्रेन प्रकल्प केवळ प्रतिकात्मक आहे. आमच्याकडेही बुलेट ट्रेन आहे हे जगाला दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. तो करायला काही हरकत नाही, पण त्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने करायला हवा. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्ज का काढायचे?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. तर, प्रस्तावित बुलेट ट्रेन महाराष्ट्रात 150 किमी अंतर कापणार आहे, तर गुजरातमध्ये 384 किमी अंतर कापणार आहे. बुलेट ट्रेनच्या 12 स्थानकांपैकी महाराष्ट्रात फक्त 4 स्टेशन येतात, गुजरातमध्ये 8 स्टेशन आहेत, अशी माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली.

बुलेट ट्रेनच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारीही केंद्र सरकारने घ्यायला हवी. महाराष्ट्र सरकारने कर्ज घ्यायचे कारण काय? विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरज काय?, बुलेट ट्रेनचा फार फायदा होईल असे वाटत नाही. बुलेट ट्रेनने मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी अडीच तास लागणार आहेत. तोच प्रवास विमानाने एक-दीड तासात होतो. दोन्हीसाठी पैसे तितकेच मोजावे लागतात. मग विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरजच काय? असा महत्त्वाचा प्रश्नही यावेळी रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विचारला.

- Advertisement -

तर, आयएफएससी सेंटर गुजरातहून महाराष्ट्रात कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जाते त्याकडे लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रातील नेत्यांनी गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार करावा, अशी विनंती रोहित पवार यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -