घरBudget 2024Maharashtra Budget Session : "भिडले नाहीत, फक्त आवाज चढला", भुसे-थोरवे वादावर देसाई म्हणतात

Maharashtra Budget Session : “भिडले नाहीत, फक्त आवाज चढला”, भुसे-थोरवे वादावर देसाई म्हणतात

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (ता. 01 मार्च) शेवटचा दिवस आहे. परंतु, आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे सरकारमधील मंत्री दादा भूसे आणि कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये हा वाद झाला आहे. ज्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरतशेठ गोगावले यांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्याचे सांगण्यात आले. परंतु, असे काहीच घडले नसून केवळ मंत्री आणि आमदार यांच्यामध्ये बोलताना केवळ आवाज वाढल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Budget Session: Shambhuraj Desai says on Dada Bhuse and Mahendra Thorve controversy )

हेही वाचा… NCP : लोणावळ्यात अजित पवार गटाला धक्का; 125 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या लॉबीत शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार भिडल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे त्यावेळी लॉबीत उपस्थित असलेले मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. ज्यानंतर आता विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर टीका केली जात आहे. तर, शिंदे गटातून या प्रकरणावर सारवासारव केली जात आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी, मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, बोलताना कोणाचा आवाज वाढला, म्हणजे वाद झाला, असे नाही. योगायोगाने मी तिथे होतो. मला जेव्हा हे समजले की, एकमेकांमधील बोलणे थोड्याशा उंच आवाजामध्ये सुरू आहे, म्हणून दोघांनाही आतमध्ये घेऊन गेलो, आत लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदारांनी त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदारांचे काम कसे मार्गी लावता येईल? हे पाहिले. सर्वांचे मतदारसंघातील प्रश्न असतात. मी त्यांच्यासोबत तिथे होतो. दोघांमध्ये चिडाचिडी झालेली नाही, कोणी कोणाच्याच अंगावर धावून गेलेले नाही. आमदारांची जी कामे आहेत, त्यासाठी आम्ही उद्याच चर्चा करुन तोडगा काढू आणि त्यांचे जे काम आहे, ते लवकरात लवकर मार्गी लावले जाईल आणि मंत्र्यांचा योग्य समन्वय निश्चितपणे आम्ही ठेवलेला आहे, असे सांगत देसाई यांनी आमदार आणि मंत्री यांच्यामध्ये कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात, त्यांनीसुद्धा खात्री केल्याशिवाय अशी कोणतीही बातमी चालवणं योग्य नाही, त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं तर ते मी सांगितलं असतं. मी सभागृहामध्ये होतो, माझं सभागृहामध्ये काम होतं, पण जेव्हा मला हे समजलं की, बाहेर माध्यमांमध्ये दोन आमदार एकमेकांना भिडल्याचं दाखवलं जात आहे म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातून बाहेर येऊन आपल्या समोर ही वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही जे सांगताय असं बिलकुल काहीही घडलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -