Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Cabinet : मंत्रिपदांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, भाजपाकडे केली ही...

Maharashtra Cabinet : मंत्रिपदांबाबत अजित पवार यांची स्पष्ट भूमिका, भाजपाकडे केली ही मागणी

Subscribe

अजित पवार यांनी भाजपाकडे 9 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये अजित पवार यांच्याव्यतिरिक्त छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. शिवाय, अजित पवार हे पुन्हा आपल्याकडे अर्थ खाते ठेवण्यीच चिन्हे आहेत.

(Maharashtra Cabinet) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. आता तो तिढा सुटला असून येत्या शनिवारी किंवा रविवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबतची भूमिका भाजपाश्रेष्ठींकडे स्पष्ट केली आहे, असे सांगण्यात येते. (Ajit Pawar wants twelve ministerial posts)

विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाला. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली आणि तिने नेत्रदीपक यश मिळवल्याने मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता, असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे, सर्वाधिक 132 जागा जिंकणाऱ्या भाजपानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. पण काल, बुधवारी दुपारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पदावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपाकडेच हे पद राहणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे जवळपास निश्चित झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका

मुख्यमंत्रिपदाचे चित्र स्पष्ट झाल्याने आता चर्चा सुरू झाली आहे, ती मंत्रिमंडळाची. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याने त्यांना कोणती खाती दिली जातात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याशिवाय, आता मिळालेल्या निर्भेळ यशाला गालबोट लागू नये, याची काळजी भाजपा घेणार असल्याने शिंदे गटातील वादग्रस्त नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवले जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे मंत्रिमंडळात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजपाकडे 9 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये अजित पवार यांच्याव्यतिरिक्त छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. शिवाय, अजित पवार हे पुन्हा आपल्याकडे अर्थ खाते ठेवण्यीच चिन्हे आहेत.

मोदी सरकारचा 9 जून 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाला स्वतंत्र राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदसाठी आग्रही राहात, अजित पवार यांनी थांबण्याची तयारी दर्शविली. आताही मुख्यमंत्रिपदावर दावा न करता, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला. हे ध्यानी घेता, त्यांची ही मागणी मान्य होण्याच दाट शक्यता आहे. (Maharashtra Cabinet: Ajit Pawar wants twelve ministerial posts)

हेही वाचा – Ajit Pawar : 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला शपथविधी; अजित दादांनी सांगितला पुढील दोन दिवसांचा कार्यक्रम


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -