घरमहाराष्ट्रकोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले 5 मोठे निर्णय

कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले 5 मोठे निर्णय

Subscribe

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. यात बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यातील कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत लाभ मिळावा म्हणून गुणांकन करण्याचा मोठा निर्णय झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, कोविड काळात वेगवेगळ्या विभागात कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार आहे. ज्यात नवीन भरती सुरु करताना या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामांचे अॅडीशनल मार्क देऊन प्राधान्य देण्यासाठी य़ोजना आखली जात आहे, त्यामुळे कोविड काळात काम करणाऱ्यांना भरती प्रक्रियेत काही ना काही प्राधान्य मिळाले पाहिजे त्यासंदर्भातील कार्यवाही केली जात आहे.

- Advertisement -

विशेषत; ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात आपत्ती होतात. यासाठी आपत्ती प्रवण क्षेत्राच्या पुर्नवसनाकरिता एक धोरण मंजुर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर देताना म्हटले होते की, आपत्ती व्यवस्थापनाकरिता आपल्याकडे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे अशी क्षेत्र चिन्हांकित करणं, तिथे आवश्यक ते पुर्ननियोजन करणे, पुर्ननियोजन करत असताना सर्वप्रकारच्या सुविधा पुरवणं, याबाबत एक चांगलं धोरण राज्य सरकारने तयार केलं आहे. यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहेत त्यांना या धोरणाप्रमाणे पुढे आपत्ती प्रवण क्षेत्र चिन्हांकित करायची आहे आणि यातील अतिसंवेदनशील आपत्ती प्रवण क्षेत्रांना पहिल्या टप्प्यात पुर्नवसन करायचे आहे, असे आदेश आज देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

जिल्ह्यातील उद्ध गोदावरी प्रकल्प याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जुन्नरमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारची एक योजनेतीस प्रत्येत गावातील प्राथमिक कृषी पत संस्थांच्या बळकटी करणासाठी त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. या संगणकीकरणासाठी लागणारा सर्व चर्चा केंद्र सरकारला करणार आहे. यातील मॅचिंग ग्रँड राज्य सरकार टाकणार आहे. यामुळे सर्व प्राथमिक संस्थांचे बळकटीकरण करता येईल, असही फडणवीस म्हणाले आहेत.


मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात भाजप साजरा करणार ‘सेवा पंधरवडा’; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -