देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होण्याची शक्यता आहे. राज्यपालभवन येथे नव्या मंत्र्यांच शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 मंत्रिपदे आणि 3 राज्यमंत्रिपदे मिळणार आहे. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. पण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियंका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच…
संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांना विरोध मंत्रिपदाच्या शपथविधीला कोट कधी घालणार? म्हणून डिवचत असत. पण, यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तापर्यंत दोघांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, अपेक्षा पूर्ण न झाल्यानं अखेरच्या क्षणी गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे आणि सिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद दिले होते.त्याशिवाय आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावरकर अथवा प्रकाश आबिटकर
कुणाला मिळणार डच्चू?
दरम्यान, माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनी विरोध केला होता. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात. प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात.
पण, दादा भुसे, गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे पुन्हा मंत्रिमंडळाच्या संभाव्या यादीत आहेत. त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : राज्यसभेत राडा! धनखड म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा”; खर्गे संतापले अन् सुनावत म्हटलं, “मग मी…”