घरमहाराष्ट्रप्रवाह विरुद्ध राजकारण करणाऱ्या दादा भुसेंनी घेतली मंत्रीपदची शपथ

प्रवाह विरुद्ध राजकारण करणाऱ्या दादा भुसेंनी घेतली मंत्रीपदची शपथ

Subscribe

मुंबई:  शिंदे – फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होत आहे. राजभवनात हा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या 18 मंत्र्यांमध्ये शिंदे गटातील आमदार दादा भुसे यांनी शपथ घेतली. त्यामुळे दादा भुसे नेमके कोण आहेत? आणि त्यांची राजकीय कारकिर्द नेमकी काय आहे? ते जाणून घेऊ…

दादा भुसे यांनी राजकीय कारकिर्द 

प्रवाहविरुद्ध राजकारण करणारा नेता अशी ओळख असलेले आमदार दादा भुसे यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. 2004 पासून सलग दादा भुसे आमदार आहेत. त्यांना कृषी खात्याचा सर्वाधिक अनुभव असल्याने राज्याच्या राजकारणात भुसेंना कृषी मंत्री म्हणून ओळखले जाते. दादा दगडु भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिकच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीएपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. मालेगाव बाह्या या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात.

- Advertisement -

काँग्रेस, समाजवादीच्या बालेकिलल्यात भुसेंची एन्ट्री 

मालेगाव हा काँग्रेस आणि समादवादी पक्षाचा गड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मालेगावात एकीकाळी काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणात इतर पक्ष टिकून राहण्याची शक्यता नव्हती. तर जिल्ह्यातील तरुणांचा कलही याच पक्षांकडे होते. अशा परिस्थितीतही मालेगावत दादा भुसे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत राजकीय कार्याला सुरुवात केली. राजकीय प्रवाहाच्या अगदी विरोधात जाऊन त्यांनी काम केले. यात त्यांना घवघवीत य़श मिळाले. गावागावात त्यांनी शिवसेनेत्या शाखा स्थापन केल्या. या राजकीय कार्यामुळे त्यांनी साधा शिवसैनिक ते थेट तालुका प्रमुख पदापर्यंत मजल मारली.  शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादा भुसे यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता, अशा परिस्थितही आपल्या हिंमतीच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले.

मालेगावात दादा भुसेंचे वर्चस्व 

मालेगावात सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांचे वर्चस्व होते. मात्र मालेगावातील या उच्चभ्रू हिरे घराण्यालाही भुसे यांनी हादरे दिले, मात्र वीस वर्षांच्या राजकीय कार्यकिर्दीत सुरुवातीला भुसे यांना हिरे घराण्यामुळे पराभव पत्करावा लागला. 2004 च्या निवडणुकीत हिरे घराण्याने त्यांचा पराभव केला. मात्र या पराभवातून भुसेंनी अशी काय यशस्वी झोप घेतली, ज्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांना सलग चारवेळा दणदणती विजय मिळाला. विशेष म्हणजे फडणवीस सरकारमध्ये त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी स्थान देण्यात आले. शेतकरी कुटुंबातील भुसेंना कृषीमंत्रीपद मिळाल्याने त्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची एक संधी मिळाली.

- Advertisement -

दादा भुसे यांचा दोन मुलं आणि पत्नी असं छोटा परिवार आहे. दादा भुसे राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या पत्नी अनिता भुसे या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांची मुलं अजिंक्य आणि अविष्कार हे युवानसेनेत कार्यरत आहेत. त्यामुळे सामाजिक आणि राजकारण अशा दोन्हींची सांगड या कुटुंबाकडून घातली जात आहे.

दादा भुसेंनी वेषांतर करत केला साठेबाजीचा घोटाळा उघड

दादा भुसे यांनी कृषी मंत्री झाल्यानंतर खता विक्रेत्यांकडून केली जाणारी साठेबाजी वेषांतर करून उघड केली होती. मंत्री झाल्यानंतर भुसे यांना काही शेतकऱ्यांनी खत विक्रेत्याकडून खत दिले जात नसल्याचं म्हणत विक्रेत्यांकडून युरियाची साठेबाजी केल्याची तक्रार आली होती. या साठेबाजी केलेल्या युरियाची नंतर जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही त्यांकडे आल्या होत्या. यावेळी दादा भुसेंनी औरंगाबादमध्ये थेट छापेमारी करत युरियाचा मोठा साठा जप्त केला. चेहऱ्यावर मोठा रुमाल बांधून भुसे एका कार्यकर्त्यासोहबत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात पोहोचले. यावेळी त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली, मात्र दुकानाच्या फलकावर खत मिळेल असे लिहिले होते. त्यामुळे दुकानदाराकडे दहा नसतील तर, किमान पाच बॅग तरी युरिया द्या,’ अशी मागणी ते तब्बल अर्धा तास करत होते. मात्र खत विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्यानंतर फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,’अशी विचारणा करत कृषिमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले. आणि दुकानातील युरियाचा मोठा साठा जप्त करत दुकानदारावर कारवाई केली.


संजय राठोडांना पुन्हा मंत्री करणं दुर्दैवी, त्यांच्याविरोधात माझा लढा सुरुच राहिल ; चित्रा वाघ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -