Homeमहाराष्ट्रMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या या आमदारांना मिळणार संधी

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या या आमदारांना मिळणार संधी

Subscribe

महायुती सरकारचा राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. 16 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याआधी म्हणजेच रविवारी (ता. 15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची आवश्यकता आहे. याकरिताच आता महायुतीतील काही तिन्ही पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपाच्या 15, शिवसेना शिंदे गटाच्या 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) 10 जणांचा समावेश आहे. आपल्याला मंत्रिपद मिळावे याकरिता अनेक आमदारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तसे बोलणे केले असल्याची माहिती गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली. (NCP MLAs will get a chance in cabinet expansion)

महायुती सरकारचा राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेससोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. त्यामुळे या विस्ताराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीतील काही आमदारांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा… Nana Patole : महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही; परभणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा सरकार इशारा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून एकूण 12 मंत्र्यांची नावे समोर आली आहे. यामध्ये आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे बाबा आत्राम यांच्या नावाला डच्चू देण्यात आला असून त्याऐवजी नरहरी झिरवाळ यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. तसा फोनही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवाळ यांना केल्याचे सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून दोन महिला आमदारांची मंत्रिमंडळासाठी निवड करण्यात आली आहे. यातील आदिती तटकरे यांनी याआधीच मंत्रिमंडळात आपले स्थान मिळवले आहे. तर पहिल्यांदा आमदार झालेल्या सना मलिक ज्या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :

1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे

राज्यमंत्री :

1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक


Edited By Poonam Khadtale