घरमहाराष्ट्रराज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना  सातवा वेतन आयोग

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना  सातवा वेतन आयोग

Subscribe

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास  मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

जालन्यात प्रादेशिक मनोरुग्णालय

जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्‍यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये आहेत. जालना शहर मराठवाडा आणि विदर्भासाठी मध्यवर्ती असून या भागातील रुग्‍णांना उपचारांसाठी पुणे, नागपूर येथे जावे लागते. जालना जिल्‍हयात प्रादेशिक मनोरुग्‍णालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जालना येथे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

- Advertisement -

यामुळे रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री  रुग्णवाहिका, औषधी आणि  उपकरणे तसेच मनुष्यबळ यासाठी १०४ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालयासाठी जमीन देण्याचा निर्णय

- Advertisement -

जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय उभारणीसाठी जमीन देण्यास आज मंत्रिमंडळाने  मान्यता  दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर ( ता. शिरोळ ) नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय  आणि ग्रंथालय उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी जयसिंगपूर येथील सि. स. नं.  २३५७अ/१अ/१ क्षेत्र २१०८ चौ. मी. ही शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मान्यता देण्यात आली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -