घरताज्या घडामोडीMaharashtra CET 2021: महाराष्ट्र सीईटीच्या अर्जासाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ

Maharashtra CET 2021: महाराष्ट्र सीईटीच्या अर्जासाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ

Subscribe

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सीईटीच्या (CET 2021) अर्जासाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ केली आहे. ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज भरला नाही आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट mahacet.org येथे भेट द्या.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी-२०२१ या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधी देण्यात आला आहे.

कसा करायचा अर्ज?

  • महाराष्ट्र सीईटीचा अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा cetcell.mahacet.org या वेबसाईटवर जा.
  • मग एक कोर्स सिलेक्ट करा.
  • त्यानंतर New Registration क्लिक करा.
  • यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
  • मग लॉग इनवर तुमचा अर्ज भरा. फोटो आणि साईन अपलोड करा.
  • त्यानंतर अर्जाचे पैसे भरा.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -