घरटेक-वेकस्वतःच्या हाताने कॉफी तयार करणारे मुख्यमंत्री

स्वतःच्या हाताने कॉफी तयार करणारे मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी आपल्या साध्या स्वभावामुळे अनेक पक्षातील बड्या आणि दिग्गज मंडळींचीही मने जिंकून घेतली आहेत.

एरव्ही मुख्यमंत्री म्हंटल की त्यांच्या खातीरदारी आणि उठ बस करण्यासाठी अवती भवती अनेक कर्मचाऱ्यांची रेलचेल असते. खाण्याची ठिकाणी बसल्या जागी हवी ती गोष्ट आणून देण्याची आयती सोय असते. पण अशा सगळ्या शासकीय प्रोटोकॉलमध्येही आपल्या साधेपणाचा आदर्श ठेवणारे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे.

महाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. पण विरोधकांनी आपसांत ताळमेळ बसवा; मगच चहापानाला बोलवा अशी टीका करत चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांना सरकारचे काम पचनी पडत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पण चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असला तरीही उद्धव ठाकरे यांनी आपल्या अत्यंत डाऊन टू अर्थ आणि साध्या स्वभावाचा आदर्श या चहापानाच्या निमित्ताने ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी या चहापानाच्या दरम्यान सर्वसामान्यांप्रमाणेच आपली स्वतःची कॉफी स्वतः तयार करून घेतली. त्यासाठी ते खुद्द कॉफी तयार होत असलेल्या काऊंटरवर पोहचले. आपल्या हवी तशी कॉफी त्यांनी तयार करून घेतली. तसेच आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत गप्पा मारत त्या कॉफीचा आस्वादही त्यांनी यावेळी घेतला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हवी तेवढी कॉफी कपात स्वतः चमच्याने घेतली. तसेच आवश्यक तितकीच साखर टाकून त्यांनी कॉफी ढवळत स्वतः तयार केलेल्या कॉफीचा आनंद घेतला. महत्वाच म्हणजे ही कॉफी तयार करण्यासाठी ते स्वतः स्टॉलपर्यंत पोहचले होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत म्हंटले आहे की , स्वतःची कॉफी टेबलावर येऊन स्वतःच्या हाताने बनवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांसोबत या व्हिडिओमध्ये खुद्द जितेंद्र आव्हाडही दिसत आहेत.चहापानानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जी आश्वासने दिली होती, त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शिव भोजन, गिरणी कामगारांना घरे देण्यासारख्या योजना कमी कालावधीत मार्गी लागल्या आहेत. तरिही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत टीका केली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -