राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

maharashtra chief secretary sanjay kumar is tested covid 19 positive he is home quarantined now
महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार

कोरोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रिमंडळात वेगाने होताना दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांना सध्या होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आल्याने भीती देखील वाढली आहे.

२२ सप्टेंबरला बैठकीत होते उपस्थित

गेल्या आठवड्यात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत संजय कुमार हजर होते. दरम्यान, त्यांना अचानक कोरोनाची काही सौम्य लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे.

जून महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती झाली होती. कोरोना नियंत्रणासाठी ते मागील काही महिन्यांपासून नेटाने प्रयत्न करत होते. तसेच राज्यातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.


हेही वाचा – लतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा!