या महिन्यात लागणार दहावीचा निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!

How to create a nine and eleven standard result
नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला विलंब झाला आहे. १६ जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही ऑनलाईनच जाहीर होईल. बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील. निकालाची नेमकी तारीख शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केली नसली तरी पुढच्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाचा निकाल लागेल हे निश्चित.

या वर्षी मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. पण सर्व पेपर होण्याच्या आधीच लॉकडाऊन सुरू झाला. शेवटचा भूगोलाचा पेपर त्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षी दहावीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. या वर्षी दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.


हे ही वाचा – भारताचा चीनला अजून एक दणका; सरकारी खरेदीत चिनी कंपन्यांवर बंदी