घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीत ताळमेळ नाहीच; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

महाविकास आघाडीत ताळमेळ नाहीच; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

महाविकास आघाडीत ताळमेळ नाही हे आम्ही अडीच वर्षांपासून सांगत होतो त्यात नवीन काय? असा सवाल उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र उद्या मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकूलातील मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत ताळमेळ नाही हे आम्ही अडीच वर्षांपासून सांगत होतो त्यात नवीन काय? असा सवाल उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र उद्या मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकूलातील मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यापूर्वी बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहाणी केली. या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मविआवर निशाणा साधला. (Maharashtra Cm Eknath Shinde Slams Mahavikas Aghadi)

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका पत्रकाराने पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत ताळमेळ दिसत नाही त्यावर काय सांगाल असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडीत ताळमेळ नाही हे आम्ही अडीच वर्षांपासून सांगत होतो त्यात नवीन काय? त्यामुळेच तर हे सरकार बदलावं लागले”, असा टोला शिंदेंनी लगावला.

- Advertisement -

याशिवाय, मुंबईतील सर्व रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप करत टीका केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता, “मुंबईकरांना जे आवश्यक आहे ते देण्याचे काम आम्ही करतो आहोत. गेली २५ वर्षे खड्ड्यांमुळे मुंबईकरांना यातना भोगाव्या लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांनीही खड्डे दाखवले. त्यात बळी गेलेल्यांच्या बातम्याही दाखवल्या. खड्डे दुरूस्तीसाठी जे कोट्यवधी रूपये टाकले जातात ते वाया जाणारे पैसे आहेत. त्यामुळे आम्ही काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करतो आहोत. पुढचे २५ ते ३० वर्षे हे रस्ते आम्ही तयार करत आहोत. शास्त्रीय दृष्ट्या उत्तम रस्ते तयार केले जात आहेत. आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळे कुणाला तरी नुकसान होत असेल तर मी त्यावर बोलू इच्छित नाही. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा असेल, कोळीवाडा आम्ही सुधरवत असू तर ते करायला आधी कुणी थांबवलं होतं का? उलट आम्ही जे काम करतो आहोत त्याला सहकार्य केलं पाहिजे”, असे उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “निवडणुका डोळ्या समोर ठेवून आम्ही कधीही काम करत नाही, यापुढे करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांचे सरकार आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विकासकामांना चालना दिली आहे. अनेक वर्षे मुंबईकरांनी खड्ड्यांतून प्रवास केला आहे. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचेही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे”.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात डिसेंबरमध्ये ४६ हजार उमेदवारांना रोजगार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -