छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वांचे विचार मोडणाऱ्यांना अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वांचे विचार मोडणाऱ्यांना अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. (Maharashtra cm eknath Shinde slams Uddhav Thackeray)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “या राज्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. याआधीही मी याबाबत माझे मत मांडले आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून जे सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांखाली शिवसेना-भाजपा युतीचे सरकार काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. त्यामुळे हे सर्वप्रकार समोर येत आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वांचे विचार मोडणाऱ्यांना अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सत्तेच्या खूर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली त्यांना आम्हाला शिकवण्याची अवशक्यता नाही”, अशा शब्दांत ठाकरेंवर निशाणा साधला.

“महाविकास आघाडी कोणासाठी सुरू होत, हे जनतेला मान्य नव्हतं. मात्र आमचे आलेले सरकार जनतेला मान्य आहे. तसेच, ज्यांना हात दाखवायचा होता. त्यांना आम्ही 30 जूनलाच दाखवला. तोही चांगला दाखवला”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

याशिवाय, “कर्नाटकाच्या विषयावर मी याआधीही बोललो. कर्नाटक-महाराष्ट्राचा वाद हा 2012 चा विषय आहे. त्यावेळी कोणाचे सरकार होते. कर्नाटकसाठी गेल्या अडीच वर्षात काय केले. कर्नाटक-महाराष्ट्र बेळगाव सीमा आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेने ४० दिवस जेलमध्ये काढली आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला शिकवायचा अधिकार नाही. तुम्ही सत्तेत असताना त्यांच्या योजना बंद केल्या. पण आमच्या सरकारने या योजना पुन्हा सुरू केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील एक इंचही जागा बाहेर जाऊ दिली जाणार नाही. सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा प्रश्व शिंदे-फडणवीस सरकार सोडलवेल”, असेही एकानाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होतेय, कोणी यावे टपली मारावी…’; उद्धव ठाकरेंची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका