घरताज्या घडामोडी'शेवटी काम तर...'; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

‘शेवटी काम तर…’; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहाणी केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहाणी केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. ‘शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनी पण’, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. (maharashtra cm eknath shinde slams uddhav thackeray)

नंदुरबार नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “काही लोक बांधावर जातात, ठीक आहे गेले पाहिजेत. शेवटी काम तर करायलाच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनी पण. जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी जमा करण्यात आले आहेत. तसेच, “ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे”, असेही त्यांनी म्हटले. यावेळी सरकारने तीन महिन्यात 72 निर्णय घेतल्याचं सांगताना 400 जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

मागील काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांच परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानावरुन विरोधकांकडून सातत्याने शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान, याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी औरंगाबादेतील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची नुकतीच पाहणी केली आहे.

या पाहाणी दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी “संकटांशी आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे धीर सोडू नका. सरकारला मदत करण्यासाठी आपण भाग पाडू”, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -