घरताज्या घडामोडी'महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला'; मुख्यमंत्र्यांकडून उदय लळीत यांच्याबाबत गौरवोद्गार

‘महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला’; मुख्यमंत्र्यांकडून उदय लळीत यांच्याबाबत गौरवोद्गार

Subscribe

कोकण आणि सोलापूर महाराष्ट्राचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होतात आणि त्यांचे सत्कार आणि गौरव करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळते. त्यामुळे आम्हाला आनंद असून आम्ही भाग्यवान आहोत. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, ही सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.

कोकण आणि सोलापूर महाराष्ट्राचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होतात आणि त्यांचे सत्कार आणि गौरव करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळते. त्यामुळे आम्हाला आनंद असून आम्ही भाग्यवान आहोत. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, ही सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. मुंबईतील राजभवनात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सभारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (Maharashtra CM Eknath Shinde Talk On Chief Justice of India Uday Lait)

“उच्च न्यायालयाच्या सत्कार सोहळ्यामध्येही उदय लळीत यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळाली होती. सरन्यायधीश उदय लळीत यांचा सत्कार करताना आमच्या मनामध्ये एक वेगळ्याच भावना आहेत. कोकण आणि सोलापूर महाराष्ट्राचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होतात आणि त्यांचे सत्कार आणि गौरव करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळते. त्यामुळे आम्हाला आनंद असून आम्ही भाग्यवान आहोत. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, ही सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोत इंजिन समजले जाते. पण ही ग्रोत फक्त आर्थिक नव्हती तर सामाजिक आणि आधुनिक सुधारणांची सुरूवातही महाराष्ट्रातून झालेली आहे. महाराष्ट्रात बुद्धिवंतांची परंपरा आहे”, असे मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

“सरन्यायाधीश उदय लळीत यांचे वकिली नैपुण्य पाहून सर्वोच्च न्यायालयानेही महत्वाच्या प्रकरणात मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या संवेदनशील प्रकरणातही म्हणजेच, तिहेरी तलाक, अॅट्रोसिटीचा दुरूपयोग, विजय माल्ल्या यांसारख्या अनेक महत्वाच्या आणि मोठ्या प्रकरणात उदय लळीत सरांनी दिलेले निर्णय आजही पतदर्शीय आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्यांचा आजचा सत्कार आदर्श आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“सरन्यायाधीश उदय लळीत यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. न्यायालय परिसरात सीसीटीव्ही लावण्यापासून केसेसचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे विषय असो, लळीत यांनी नेहमीच पारदर्शकतेचा पुरस्कार केला. त्यामुळे न्यायालयातील सुनावणी आपण लाइव्ह पाहू शकतो. लळीत यांनी अनेक प्रकरणे निकालात काढली”, असेही शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -