घरमहाराष्ट्रPooja Chavan आत्महत्या प्रकरण : संशयकल्‍लोळ...मुख्यमंत्र्यांचे निष्पक्ष चौकशीचे आदेश

Pooja Chavan आत्महत्या प्रकरण : संशयकल्‍लोळ…मुख्यमंत्र्यांचे निष्पक्ष चौकशीचे आदेश

Subscribe

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चर्चा केल्यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संशयकल्लोळ वाढत चालला आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेली शिवसेना पुरती बॅकफूटवर आली आहे. धनंजय मुंडे यांना वाचवता वाचवता आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कसरत करावी लागली होती. आता पुन्हा एकदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव आल्याने हे सरकार वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, याची पडताळणी केली जाईल. दोषी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र यापूर्वी अशा प्रकरणांमुळे अनेकांना निष्कारण आयुष्यातून उठवण्याच्या झालेल्या प्रयत्नांचीही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने आठवण करून दिली. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने वनमंत्री राठोड यांना नोटीस बजावली आह

- Advertisement -

राठोड प्रकरणात तिन्ही पक्षांची चांगलीच अडचण झाली आहे. शिवसेनेने संजय राठोड यांना माध्यमांशी न बोलण्याचे फर्मान काढले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी झाल्याशिवाय याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. असंख्य खस्ता खावून कार्यकर्ते मोठ्या पदापर्यंत पोहोचत असतात. त्यांना बदनाम करण्यासाठी वेळ जात नाही. तेव्हा अशा प्रकरणात चौकशी केल्याविना कोणी आरोप करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पूजा चव्हाण हिने केलेल्या आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने जोरदार मोहीम सुरू केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून ते मंत्रालयात आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल आहे. गेल्या दोन दिवसांपासून राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच असल्याने त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढू लागले आहे. पूजा हिने रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. यानंतर आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिपनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्यावरच निशाणा साधत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. राठोड यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांच्यावर सखोल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

राठोड यांचे नाव या प्रकरणात घेतले जाऊ लागल्यावर त्यांच्या यवतमाळच्या निवासस्थानी नेहमी असलेली कार्यकर्त्यांची वर्दळ थांबली आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप होऊ लागल्यावर शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. आरोप होऊन आठवडा उलटत असतानाही त्यांनी स्वत:ची बाजू मांडली नाही. शिवसेनेच्या एकाही नेत्याने याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र राठोड यांना सावरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय कोणीही आरोप करू नये, असे आवाहन करताना अजित पवार यांनी कार्यकर्ते घडायला वर्षोनुवर्षे खस्ता खाव्या लागतात. त्याला बदनाम करायला वेळ लागत नाही. यामुळे अशा प्रकरणाचे राजकारण करण्याऐवजी त्याची चौकशी होऊ द्या, नंतरच काय तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुमोटो केस दाखल करा-चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस का चौकशी करत नाही, मुलीचे आईवडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे. काहीही करा काही होत नाही, असे ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे.

वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल 
बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पूजा चव्हाण हिने केलेल्या आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने जोरदार मोहीम सुरू केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून ते मंत्रालयात आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल आहे. गेल्या दोन दिवसांपासून राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच असल्याने त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढू लागले आहे. पूजा हिनेे रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. यानंतर आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिपनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्यावरच निशाणा साधत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -