घरताज्या घडामोडीदेशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानावर

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानावर

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता कमी आहे.

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. तसंच कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढतानाच दिसत आहे. यामुळे ठाकरे सरकारला अपयश आल्याचे सांगत भाजपने ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले. पण तरी देखील ठाकरे सरकार कोरोनाशी सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. दरम्यान देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपाशासित राज्यातील एकही मुख्यमंत्री नाही आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्था संयुत्करित्या सर्वेक्षण करतात. त्याच सर्वेक्षण अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे समोर आले आहे.

या सर्वेक्षण अहवालामध्ये बहुतांशी मतदारांनी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ६६.२० टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना २३.२१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. या सर्वेक्षणामध्ये राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे देखील जाणून घेतले. देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामाबद्दल ८२.९६ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

पटनायक यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेल बघेल असून त्यांना ८१.०६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन असून त्यांना ८०.२८ टक्के मते मिळाली आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर मान व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आहेत. त्यांना ७८.५२ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या क्रमाकांवर असून त्यांना ७६.५२ टक्के मते मिळाली आहेत. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचे नाव असून त्यांना ७४ टक्के मते आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकले आहे.


हेही वाचा – Cyclone Nisarga: वादळाचा वेग वाढू शकतो, पुढील २-३ तास महत्त्वाचे – बाळासाहेब थोरात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -