Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'महानिर्मिती'ची वीजकेंद्रे व्हेंटिलेटरवर; केवळ चार-पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा

‘महानिर्मिती’ची वीजकेंद्रे व्हेंटिलेटरवर; केवळ चार-पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा

Subscribe

देशात कोळशाचा तुटवडा असल्यानं वीजनिर्मितीवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. महानिर्मितीकडे सध्या चार ते पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो.

देशात सध्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. यंदा पाऊस कमी झाल्यानं, उकाडा वाढला आहे आणि त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. असं असताना देशात कोळशाचा तुटवडा असल्यानं वीजनिर्मितीवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. महानिर्मितीकडे सध्या चार ते पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो. (Maharashtra coal Maha Nirmiti power plants on ventilators Only enough coal to last four to five days)

महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता 9500 मेगावॅटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती करत असल्यानं त्यांना दररोज जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन कोळसा आहे. मात्र, नाशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रात चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचं पाणी शिरल्यास किंवा रेल्वे्चाय तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मितीत करणं कठीण होणारी आहे. केंद्र सरकारने देशातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती वाढवण्याचे निर्देश सर्वच राज्यांना दिलं आहे. मात्र, महानिर्मितीकडे असलेला कोळसा पाहता वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

औष्णिक वीज केंद्रातून अखंडितपणे वीजनिर्मिती करता यावी म्हणून केंद्रात सात दिवस पुरेल एवढ्या कोळशाचा साठा असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा कोळशाचा साठा खाली आल्यास क्रिटिकल परिस्थिती तर चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे आता कोळसा जो महानिर्मितीकडे आहे तो केवळ चार ते पाच दिवसांचा आहे त्यामुळे आताची ही स्थिती क्रिटिकल आहे आणि चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध असल्यास सुपर क्रिटिकल परिस्थिती समजली जाते.

(हेही वाचा: आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर माफीनामा; नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? )

वीज केंद्र उपलब्ध कोळसा

  • नाशिक- 8 दिवस पुरेल एवढा
  • खापरखेडा- 5 दिवस पुरेल एवढा
  • चंद्रपूर- 5 दिवस पुरेल एवढा
  • परळी- 5 दिवस पुरेल एवढा
  • भुसावळ- 5 दिवस पुरेल एवढा
  • पारस- 4 दिवस पुरेल एवढा
  • कोराडी- 9-10 दिवस पुरेल एवढा
- Advertisement -

- Advertisment -