कॉंग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांचा उल्लेख होताच राहुल गांधी भावूक

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात 'भारत जोडो यात्रा' काढण्यात येत आहे. सध्या कॉंग्रेसची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात असून, आज महाराष्ट्रातील यात्रेचा सहावा दिवस आहे. एकीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांसह नागरिकांचा या यात्रेला उस्फुर्द प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे या यात्रेत राहुल गांधी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात येत आहे. सध्या कॉंग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असून, आज महाराष्ट्रातील यात्रेचा सहावा दिवस आहे. एकीकडे कॉंग्रेसच्या नेत्यांसह नागरिकांचा या यात्रेला उस्फुर्द प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे या यात्रेत राहुल गांधी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी ‘भारत जोडो यात्रा’ हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. यावेळी हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण करत असताना राहुल गांधी भावूक झाले. राजीव सातव यांचा उल्लेख निघताच पदयात्रेतील अनेकांनी सातव यांची उणीव जाणून येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. (Maharashtra Congress MP Rahul Gandhi Speak About Rajiv Satav During Bharat Jodo Yatra In Hingoli)

हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव आणि गांधी कुटुंब यांचे अनेक वर्षांचे जवळचे संबंध आहेत. माजी मंत्री रजनी सातव यांनी 1980 ते 90दरम्यान या हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजीव 2009 मध्ये येथून आमदार झाले. राजीव सातव हे युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदापासून राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. राज्य युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील सांभाळले.

राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभेची 2014ची निवडणूक लढवली. यामध्ये कॉंग्रेसच्या दोन खासदारांचा विजय झाला होता. यामध्ये राजीव सातव हे विजयी झाले होते. दरम्यान, कोरोना काळात 16 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सातव यांच्या अकाली निधनाने गांधी परिवार आणि कॉंग्रेस यांच्यासह अनेकांना धक्का होता.

हिंगोलीत बोलताना राहुल गांधी यांनी “राजीव सातव आपल्यात नाहीत. त्यांची आज आठवण येत आहे,असे बोलून राहुल गांधी भावूक झाले. राजीव सातवजी आपल्यासोबत नाहीत. याप्रसंगी मी त्यांचं नाव घेऊ इच्छितो, त्यांचं स्मरण करु इच्छितो”, असे म्हटले.


हेही वाचा – त्यांची काही अमृतवाणी, शिववाणी नाही! आमची दिशा योग्यच…; संजय राऊतांचे गजानन कीर्तिकरांना प्रत्युत्तर