Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Video: कथनी, करणीमध्ये फरक, हीच ढोंगीजीवींची ओळख; काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

Video: कथनी, करणीमध्ये फरक, हीच ढोंगीजीवींची ओळख; काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

Related Story

- Advertisement -

काँग्रेसने इंधन दरवाढीवरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने निर्मला सीतारमण यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. इंधन दरवाढीवर सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना केलेलं विधान असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने हिच ढोंगीजीवींची ओळख असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीवरुन काँग्रेस चांगलाच आक्रमक झाला आहे. प्रत्येक राज्यात इंधन दरवाढविरोधात आंदोलन करत आहेत.

काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण या जेव्हा मंत्री नव्हत्या तेव्हा इंधन दरवाढवर बोलताना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी इंधनाचे दर सरकारने कमी करावेत, असं एका व्हिडिओमध्ये बोलत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये इंधनाच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसल्याचं सांगत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक, हीच आहे ढोंगीजीवींची खरी ओळख, असं म्हणत टोला लगावला आहे.

- Advertisement -

मी मीझी भूमिका बदलेली नाही – नाना पटोले

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढ, शेकऱ्यांचे प्रश्न यावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. याच मुद्द्यांना घेऊन “मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.


- Advertisement -

हेही वाचा – लोका सांगे ब्रह्म ज्ञान…’; मंत्र्यांच्या सभांचे फोटो शेअर करत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisement -