घरमहाराष्ट्रसंजय राऊत आणि 'सामना' दोघांनाही आम्ही गांभीर्याने घेत नाही - नाना पटोले

संजय राऊत आणि ‘सामना’ दोघांनाही आम्ही गांभीर्याने घेत नाही – नाना पटोले

Subscribe

महाविकास आघाडी देशाच्या राजकारणातील एक आदर्श राजकीय आघाडी असून राष्ट्रीय पातळीवर देखील अशा आघाडीची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आणि ‘सामना’ दोघांनाही आम्ही गांभीर्यानं घेत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं. संजय राऊत यांना आम्ही मागेच उत्तर दिलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

“संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. कारण त्यांना जे काही सांगायचं होतं ते आम्ही मागच्या काळआत सांगून झालं आहे. त्यांचा ‘सामना’ आम्ही वाचायचा बंद केला आहे. जर आमच्या नेत्यावर, आमच्या संघटनेवर टीका होत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. पण जर दुसऱ्यावर टीका करुन आपला पक्ष मोठा होतो, असं जर वाटत असेल त्यांनी आपल्याकडे चार बोटं आहेत हे लक्षात ठेवावं,” असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊत यांचा यू-टर्न

संजय राऊत यांनी देशात भाजपविरोधी आघाडी स्थापन होण्याची गरज यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. त्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं , असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घएत शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) घटक पक्ष नसल्याने राऊत यांनी त्यावर बोलू नये, असं सुनावलं होतं. दरम्यान, संजय राऊत यांनी आता यू-टर्न घेतला असून भाजपविरोधी आघाडीचा काँग्रेस हा आत्मा असेल , असं म्हटलं आहे. त्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -