घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात १०,४४१ नव्या रुग्णांची नोंद, २५८ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात १०,४४१ नव्या रुग्णांची नोंद, २५८ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा असून राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३४ हजार ८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यात २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३४, ठाणे ५, नवी मुंबई ८, उल्हासनगर ७, नाशिक १०, अहमदनगर १२, पुणे ५१, पिंपरी चिंचवड मनपा १६, कोल्हापूर १३, सांगली ११, नागपूर २२ यांचा समावेश आहे. आज ८,१५७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,८८,२७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण झाले बरे

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हा आहे सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -