घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: मृतांच्या संख्येत घट; १० हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद 

Maharashtra Corona Update: मृतांच्या संख्येत घट; १० हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद 

Subscribe

मृतांप्रमाणेच शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडाही कमी झाला.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ४०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. शनिवारी हा आकडा कमी झाला. राज्यात आज ३६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७८,३४,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,९८,५५० (१५.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६३,२२७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ५,८०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

१० हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद   

मृतांप्रमाणेच शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडाही कमी झाला. आज राज्यात १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ४७४ इतकी झाली आहे.

- Advertisement -

१४ हजारहून अधिक रुग्ण बरे 

कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी होत असतानाच राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहेत. आज १४ हजार ९१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३१,७६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८ टक्के एवढे झाले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -