Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात आज 1080 नवे रुग्ण, तर 47 जणांचा मृत्यू

maharashtra corona update 1080 new corona patients and 47 death in last 24 hrs in state

राज्यात गेल्याकाही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र आज नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काल 900 वर पोहचलेली रुग्णसंख्या आज पुन्हा 1 हजारांच्या पार गेली आहे. तर मृतांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 1080 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय राज्यात आज 2 हजार 488 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या 13,700 झाली आहे.

राज्यात आजपर्यंत 76,99,623 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.96 टक्के झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे.

सध्या राज्यात 1 लाख 76 हजार 560 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. यातील 78 लाख 60 हजार 317 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात आज 4509 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


कुतुबमिनार परिसरातील मशिदीवरील दाव्याबाबत भगवान विष्णू आणि जैन देवतांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल