घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, २४ तासात ११ हजार ३९४...

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, २४ तासात ११ हजार ३९४ रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात ६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी सध्या ७ लाख ९५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटईनमध्ये आहेत.

राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी होत चालला आहे. गेल्या २४ तासामध्ये नव्या कोरोनाबाधितांपेक्षा (Maharashtra Corona Update) कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. राज्यात गेल्या २४ तासात ११ हजार ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २१ हजार ६७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईतही कोरोना परिस्थिती सुधार आहेत. मुंबईत गेल्या २४ तासात ८४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर आहे. शनिवारी राज्यात एकही ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली नाही.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्येत घट झाली आहे. शनिवारी राज्यात ११ हजार ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज राज्यात एकूण १ लाख ३३ हजार ६५५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,९४,०३४ झाली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु आजपर्यंत ३ हजार ३३४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

राज्यात ६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी सध्या ७ लाख ९५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटईनमध्ये आहेत. २ हजार ४४७ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबईत २४ तासात ६४६ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या (Mumbai Corona Update) घटली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संथ्या हजारांवर होती. मात्र सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाला असल्याचा पाहायला मिळत आहे. शनिवारी मुंबईत ६४३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २४ हजार ९९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९७ टक्क्यांवर गेला आहे. सध्या ६ हजार ३६७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -


हेही वाचा : Breaking : पुण्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -