Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 113 कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

राज्यातील आज एकूण २८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ७७ लाख, २३ हजार, २८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.११ टक्के इतका आहे.

maharashtra corona update 113 corona patient found in State today
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 113 कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा उतरला आलेख सुरू असून राज्यात शनिवारी दोन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शनिवारी ९७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती आज या संख्येत किंचित वाढ झाली असून राज्यात मागील २४ तासात ११३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आजही एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के एवढा आहे.

तर राज्यातील आज एकूण २८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ७७ लाख, २३ हजार, २८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.११ टक्के इतका आहे. कालच्या तुलनेत आजच्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. राज्यात आजच्या दिवशी १ हजार ३५४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील ४-५ दिवसात राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने कमी झाली आहे. पाहा राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय अहवाल.

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६६३९ १०३६७८५ १६६९३ २८६३ २९८
ठाणे ७६६५२९ ७५४४७३ ११८६९ ३५ १५२
पालघर १६३४४८ १६००३३ ३३९२ १५
रायगड २४४२७१ २३९३०४ ४९३७ २३
रत्नागिरी ८४४०४ ८१८५४ २५४१
सिंधुदुर्ग ५७१४४ ५५६०३ १५१३ १५ १३
पुणे १४५२२६६ १४३१३३३ २०१६३ ३५० ४२०
सातारा २७८१५६ २७१४१७ ६६७९ ३४ २६
सांगली २२७०२४ २२१३५९ ५६५५
१० कोल्हापूर २२०४५४ २१४५३२ ५८९९ १८
११ सोलापूर २२७०१६ २२११२६ ५७५९ ११७ १४
१२ नाशिक ४७२७८१ ४६३८०४ ८९०४ ७२
१३ अहमदनगर ३७७३८८ ३७००१० ७२३० ११ १३७
१४ जळगाव १४९४८७ १४६७२२ २७२८ ३३
१५ नंदूरबार ४६६११ ४५६४९ ९५९
१६ धुळे ५०७०५ ५००३५ ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६४०० १७२०७७ ४२७० १४ ३९
१८ जालना ६६३०९ ६५०८४ १२२३
१९ बीड १०९१०९ १०६२१० २८७५ १७
२० लातूर १०४९११ १०२४१४ २४८३
२१ परभणी ५८५३७ ५७२५२ १२५६ २०
२२ हिंगोली २२१६६ २१६५२ ५१३
२३ नांदेड १०२६५५ ९९९४२ २६९७
२४ उस्मानाबाद ७५१३८ ७२९९५ २०२३ ११६
२५ अमरावती १०५९२८ १०४३०० १६२२
२६ अकोला ६६१६५ ६४६९१ १४६५
२७ वाशिम ४५६१४ ४४९७१ ६३८
२८ बुलढाणा ९१९२१ ९१०७६ ८२४ १५
२९ यवतमाळ ८१९७८ ८०१५८ १८१६
३० नागपूर ५७६३२७ ५६७०८१ ९१४३ ७१ ३२
३१ वर्धा ६५६६३ ६४२५४ १२३७ १७१
३२ भंडारा ६७९३७ ६६७९४ ११३२ १०
३३ गोंदिया ४५४१५ ४४८२१ ५८०
३४ चंद्रपूर ९८८१२ ९७२१८ १५८८
३५ गडचिरोली ३६९६१ ३६२२८ ६९१ ३४
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७८७२४१३ ७७२३२८८ १४३७६७ ४००४ १३५४

 

राज्यात आतापर्यंत ७ कोटी ८९ लाख ५२ हजार ३१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात त्यातील ७८ लाख ७२ हजार ४१३ चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. राज्यातील रुग्णसंख्या मोठ्या संख्येने कमी होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आली असली नियमांचे पालन केल्यात संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोमामुक्त होईल.


हेही वाचा – India Corona Update Today: देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही घट! 24 तासांत 1761 नव्या रुग्णांची नोंद