Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 1151 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू; मात्र ओमिक्रानबाधितांची संख्या शून्यावर

राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. परंतु आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4345 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

maharashtra corona update 1151 new corona patients and 23 death in last 24 hrs in state
Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 1151 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 1151 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. काल राज्यात 1080 नवे रुग्ण आढळून आले होते, तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार होत आहेत. विशेष म्हणजे राज्यात आजही एकही ओमिक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. तर पाच महानगरपालिकांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान 29 महानगरपालिकांमध्ये कोरोनाची एकेरी संख्या नोंदवण्यात आली आहे. तर 47 महानगरपालिकांमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. ही बाब राज्यासाठी कुठेतरी दिलासाजनक आहे.

राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 64 हजार 050 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 922 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 74 लाख 84 हजार 114 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. तर राज्यातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या 11, 604 झाली आहे.

राज्यात आजपर्यंत 78 लाख 61 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत 77,02,217 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.97 टक्के झाले आहे. 23 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 64 हजार 050 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 922 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 74 लाख 84 हजार 114 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. परंतु आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4345 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


Mumbai corona Update : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण मृत्यूची नोंद शून्यच, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार