घरCORONA UPDATEmaharashtra corona update: राज्यात गेल्या २४ तासात १२ हजार तर मुंबईत ७९४...

maharashtra corona update: राज्यात गेल्या २४ तासात १२ हजार तर मुंबईत ७९४ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यात एकुण २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू तर मुंबईत २० रुग्णांचा मृत्यू

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात आली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झालं नाही आहे. परंतु दिलासादायक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. त्या जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. उद्यापासून या जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरु होत आहे. राज्यात मागील २४ तासात १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकुण २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.

राज्यात आतापर्यंत १४ हजार ४३३ कोरोनाबाधितांनी गेल्या २४ तासात कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकून ५५ लाख ४३ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. एकुण १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आज २३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ करोड ६५ लाख ८ हजार ९६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५८ लाख ३१ हजार ७८१ कोरोना चाचण्यांचे नमुने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज नोंद झालेल्या एकूण २३३ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८५ ने वाढली आहे. हे ३८५ मृत्यू, पुणे-१३७, नागपूर-४५, औरंगाबाद-३३, यवतमाळ-३१, अहमदनगर-२६, कोल्हापूर-२६, नाशिक-१८, सातारा-१२, लातूर-७, सांगली-७, गडचिरोली-६, बीड-५, गोंदिया-५, ठाणे-५, हिंगोली-४, सोलापूर-४, रत्नागिरी -३, सिंधुदुर्ग-३, अकोला-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, नांदेड-१, नंदूरबार-१, रायगड-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात ७९४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात ७९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत ७ लाख ११ हजार ६०१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील २४ तासात ८३३ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६ लाख ७८ हजार २७८ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १५ हजार ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकुण ६४ लाख २५ हजार ४२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात २६ हजार ७५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -