Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे 121 नवे रुग्ण, मुंबईतील 68 रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या 474 अॅटिव्ह रुग्ण आहे.

maharashtra corona update 121 new corona patients 66 discharged in state last 24 hours and mumbai report 68 new corona patients
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे 121 नवे रुग्ण, मुंबईतील 68 रुग्णांची नोंद

देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. राज्यात आज कोरोनाचे 121 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या आजही शून्य आहे. मात्र राज्यातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज वाढली आहे. राज्यात आज 817 अॅटिव्ह रुग्णांची नोंद झाली आगे. तर 66 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज शून्य कोरोना मृतांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 855 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झालेय. राज्यात आजपर्यंत 7, 99, 92, 659 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान आज मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आज कमी झाली आहे, मुंबईत आज 68 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 44 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर आजही मुंबईत मृतांचा आकडा शून्यावर पोहोचला आहे. दरम्यान मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहचले आहे.

मुंबईत सध्या 474 अॅटिव्ह रुग्ण आहे. मुंबईत आज नोंद झालेल्या 68 रुग्णांपैकी 3 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. . दरम्यान मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 11343 दिवसांवर पोहचला आहे. 15 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2022 दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.006 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान मुंबईत आज 8,700 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.