Maharashtra Corona Update: बाधितांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घट; राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

Maharashtra Corona Update 1 thousand 494 corona victims recorded in 24 hours
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून आज राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित रूग्णांमध्ये घट झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी १३,६५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ लाख १९ हजार २२४ झाली आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८८ हजार ०२७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाबाधित नव्या रूग्णांमध्ये घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

फेब्रुवारीपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मे महिन्यापासून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊन व सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होऊ लागली आहे. अखेर शनिवारी मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी रुग्णांनी नोंद झाली. शनिवारी राज्यामध्ये १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. १० मार्च २०२१ रोजी शनिवार इतकेच रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णसंख्या बरी होण्याबरोबरच शनिवारी रुग्ण बरे होण्याचा दरही तीन महिन्यांनंतर ९५ टक्क्यांवर आला आहे. दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात शनिवारी ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ९९,५१२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. मुंबईमध्ये २९, नाशिक २२, पुणे २८, कोल्हापूर ५८, सातारा १७, सांगली १७, रत्नागिरी १५यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.