घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात २४ तासात १३७ कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक...

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासात १३७ कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांध्ये १३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या नोंदीमध्ये सातत्याने चढउतार दिसत आहे. सर्वाधिक रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली असल्याचे अहवालात समोर आले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.८७ टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिकांना मास्क घालण ऐच्छिक करण्यात आले आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९९,१३,४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७६,०४१ (०९.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. १०८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२७,५५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे.

- Advertisement -

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. ६६० सक्रिय रुग्णांपैकी मुंबईत ३९० रुग्ण त्या पाठोपाठ ठाण्यात ४९ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पुण्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये १४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७६,०४१ झाली आहे.


हेही वाचा : कितीही हल्ले करा आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -