घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात सोमवारी १५ हजार ५१ नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात सोमवारी १५ हजार ५१ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर,यवतमाळ, नाशिक,जळगाव यासांरख्या जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू त्याचप्रमाणे कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. आज राज्यात १५ हजार ५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात २१ लाख ४४ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९२.०७ टक्के इतका आहे. तर राज्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा २.२७ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ७६ लाख ९ हजार २४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २३ लाख २९ हजार ४६४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या ६ लाख २३ हजार १२१ लोक होमक्वारंटाईन आहेत तर ६ हजार ११४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता सध्या राज्यात १ लाख ३० हजार ५४७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईचा विचार केला असता मुंबईत आता पर्यंत ३ लाख ४५ हजार ६७५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १३ हजार ३०९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात सध्या १२ हजार ६८० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.त्याचप्रमाणे रत्नागिरीत २०७ तर २३४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात २६ हजार ४६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील वाढती कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येमळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. मात्र असे असले तरी जनतेने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात दररोज सव्वा लाख लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ३० लाखांपर्यत लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यातील जिल्ह्यातील आजची आकडेवारी पुढीलप्रमाणे

- Advertisement -
अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३४५६७५ ३१९९२७ ११५३९ ९०० १३३०९
ठाणे २९४०९४ २७५५०७ ५८७६ ३१ १२६८०
पालघर ४९९४६ ४७८५५ ९३९ १० ११४२
रायगड ७३१९२ ७००२६ १६१४ १५५०
रत्नागिरी १२३४१ ११७०७ ४२५ २०७
सिंधुदुर्ग ६७८२ ६३६७ १८१ २३४
पुणे ४४१७४५ ४०७०८४ ८१४४ ४९ २६४६८
सातारा ६०८७१ ५७३८६ १८५९ १६१७
सांगली ५१८७६ ४९३०४ १८०१ ७६९
१० कोल्हापूर ५०१७४ ४८०६७ १६८४ ४२०
११ सोलापूर ५९९०८ ५६४९२ १८६३ ५० १५०३
१२ नाशिक १३९०६४ १२८९३४ २०९४ ८०३५
१३ अहमदनगर ८०४२८ ७६९८४ ११७२ २२७१
१४ जळगाव ७०३०४ ६३७८६ १५४३ २० ४९५५
१५ नंदूरबार ११७१४ १०१८३ २२९ १३०१
१६ धुळे १९१८० १६९४१ ३३७ १९००
१७ औरंगाबाद ६०२१४ ५१००७ १२९४ १४ ७८९९
१८ जालना १६८८७ १६०१३ ३९४ ४७९
१९ बीड २१०४० १८६७८ ५७९ १७७७
२० लातूर २७०६९ २५२९४ ७१७ १०५४
२१ परभणी ९४७१ ८०७२ ३१३ ११ १०७५
२२ हिंगोली ५३८८ ४५३४ १०० ७५४
२३ नांदेड २६६०२ २२८३६ ६९२ ३०६९
२४ उस्मानाबाद १८६०६ १७४७६ ५७७ १६ ५३७
२५ अमरावती ४३६८६ ३९१८० ५७४ ३९३०
२६ अकोला २०५१४ १६९३९ ४०४ ३१६७
२७ वाशिम ११५३८ १०२५४ १६९ १११२
२८ बुलढाणा २१२१४ १८१६३ २७१ २७७५
२९ यवतमाळ २२२६४ १९०९४ ४९७ २६६९
३० नागपूर १७५९९५ १५४२५४ ३५८७ ४० १८११४
३१ वर्धा १६४८८ १४४८५ ३३५ ४८ १६२०
३२ भंडारा १४६८५ १३७३७ ३१५ ६३२
३३ गोंदिया १४९०७ १४४७८ १७५ २४८
३४ चंद्रपूर २६११५ २४६८३ ४२२ १००८
३५ गडचिरोली ९३४१ ९०१६ १०३ २१४
इतरराज्ये/ देश १४६ ९१ ५३
एकूण २३२९४६४ २१४४७४३ ५२९०९ १२६५ १३०५४७

 

 


हेही वाचा – कोरोना रुग्णवाढीत नाशिक राज्यात टॉप

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -