Maharashtra Corona Update: आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

राज्यात आज रोजी एकूण १,५८,१५१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत ३,३३४ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील १,०८० रुग्ण आहेत.

maharashtra corona update 15252 new corona cases and no new omicron patient found in last 24 hours
Maharashtra Corona Update: आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून बुधवारच्या तुलनेत राज्यात आज गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गुरुवारी राज्यात १५,२५२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या १८ हजारांहून अधिक होती. आज ३ हजारांनी ही रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या देखील कमी होत असून आज पुन्हा राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. मंगळवारी देखील राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळला नव्हता. काल मात्र राज्यात ११३ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता राज्याचा रिकव्हरी रेट हा पॉझिटिव्हीटी रेटहून अधिक आहे. राज्यात आज गुरुवारी ३०,२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल हा आकडा ३६ हजारांहून अधिक होता. आज यात ५ हजारांनी घट झाली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा पाहता तो ७४,६३,८६८ इतका आहे. तर दुसरीकडे मागच्या २४ तासात राज्यात ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा सध्याचा मृत्यू दर १.८३ टक्के इतका आहे. राज्या

राज्यात आज रोजी एकूण १,५८,१५१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत ३,३३४ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील १,०८० रुग्ण आहेत. राज्यातील सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांचा तपशील पाहा.

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०४८४३० १०२१३९५ १६६४७ २७८७ ७६०१
ठाणे ७६१९२१ ७३९४७३ ११७७७ ३५ १०६३६
पालघर १६२५३२ १५८४१९ ३३८२ १५ ७१६
रायगड २४२०४४ २३३६९३ ४८९० ३४५४
रत्नागिरी ८३८६७ ८०५७६ २५२१ ७६५
सिंधुदुर्ग ५६७९९ ५४६५० १४९१ १५ ६४३
पुणे १४२३७९२ १३५६७४७ १९९८५ ३५० ४६७१०
सातारा २७५४०६ २६४५९९ ६६०८ ३४ ४१६५
सांगली २२४९४० २१६२४८ ५६४७ ३०३६
१० कोल्हापूर २१८९३६ २०९६५० ५८७७ ३४०४
११ सोलापूर २२४८३५ २१५०१९ ५६७५ ११४ ४०२७
१२ नाशिक ४६७३९५ ४४६४११ ८८४१ १२१४२
१३ अहमदनगर ३६९१७३ ३५३६०६ ७१९९ ११ ८३५७
१४ जळगाव १४८४५८ १४३५९८ २७२३ ३३ २१०४
१५ नंदूरबार ४५४१९ ४३५९० ९५१ ८७५
१६ धुळे ५००९० ४८८५९ ६५९ ११ ५६१
१७ औरंगाबाद १७३७१८ १६४३७९ ४२६९ १४ ५०५६
१८ जालना ६५७६० ६३३५९ १२१९ ११८१
१९ बीड १०८३८१ १०४५१० २८५९ १००५
२० लातूर १०३६९९ ९९२२५ २४६५ २००३
२१ परभणी ५७९०९ ५५६२३ १२३९ २० १०२७
२२ हिंगोली २१३४१ १९७६० ५०८ १०७२
२३ नांदेड १०१६८० ९६९२९ २६८० २०६४
२४ उस्मानाबाद ७३८९२ ७०७४९ २००७ ११६ १०२०
२५ अमरावती १०३५३३ १०००४६ १६०७ १८७८
२६ अकोला ६५४७२ ६२९२७ १४४६ १०९५
२७ वाशिम ४४५३४ ४३१०६ ६३७ ७८८
२८ बुलढाणा ८८८९३ ८५३०७ ८१४ २७६६
२९ यवतमाळ ८०९५६ ७७५८० १८०६ १५६६
३० नागपूर ५६६०९३ ५३८७३५ ९१३३ ७१ १८१५४
३१ वर्धा ६४५७५ ६०२०१ १२२७ १६९ २९७८
३२ भंडारा ६६६०३ ६३९११ ११२८ १० १५५४
३३ गोंदिया ४४८६३ ४३३४० ५७७ ९३९
३४ चंद्रपूर ९७९४५ ९४६१८ १५७२ १७५१
३५ गडचिरोली ३४७७२ ३२९९९ ६८२ ३३ १०५८
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७७६८८०० ७४६३८६८ १४२८५९ ३९२२ १५८१५१

 

 


हेही वाचा – India Corona Update : देशातील कोरोना बळींच्या संख्येत घट; रुग्णसंख्या 1 लाख 72 हजारांवर