घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 156 नवे रुग्ण, 269 कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 156 नवे रुग्ण, 269 कोरोनामुक्त

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 156 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 269 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे आजही राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचे फक्त 99 नवे रुग्ण आढळून आले होते, तर 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 159 झाली आहे. राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 308 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत 275, ठाणे 146, अहमदनगरमध्ये 122 सक्रीय रुग्ण आहेत. तर नंदुरबार, धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती खालीलप्रमाणे :-

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५६६९३ १०३६८६१ १६६९३ २८६४ २७५
ठाणे ७६६५४१ ७५४४९१ ११८६९ ३५ १४६
पालघर १६३४४९ १६००३५ ३३९२ १५
रायगड २४४२७४ २३९३०६ ४९३७ २४
रत्नागिरी ८४४०४ ८१८५७ २५४१
सिंधुदुर्ग ५७१४४ ५५६०६ १५१३ १५ १०
पुणे १४५२३२६ १४३१५०५ २०१६३ ३५० ३०८
सातारा २७८१६६ २७१४२४ ६६७९ ३४ २९
सांगली २२७०२६ २२१३५९ ५६५५
१० कोल्हापूर २२०४५६ २१४५३४ ५८९९ १८
११ सोलापूर २२७०१६ २२११३० ५७५९ ११७ १०
१२ नाशिक ४७२७८६ ४६३८१५ ८९०४ ६६
१३ अहमदनगर ३७७४०९ ३७००४६ ७२३० ११ १२२
१४ जळगाव १४९४९२ १४६७२५ २७२८ ३३
१५ नंदूरबार ४६६११ ४५६४९ ९५९
१६ धुळे ५०७०५ ५००३५ ६५९ ११
१७ औरंगाबाद १७६४६० १७२१४८ ४२७० १४ २८
१८ जालना ६६३१० ६५०८४ १२२३
१९ बीड १०९११३ १०६२१४ २८७५ १७
२० लातूर १०४९१३ १०२४१५ २४८३
२१ परभणी ५८५३७ ५७२५५ १२५६ २०
२२ हिंगोली २२१६६ २१६५२ ५१३
२३ नांदेड १०२६५५ ९९९४४ २६९७
२४ उस्मानाबाद ७५१३९ ७२९९६ २०२३ ११६
२५ अमरावती १०५९२९ १०४३०१ १६२२
२६ अकोला ६६१६५ ६४६९३ १४६५
२७ वाशिम ४५६१४ ४४९७२ ६३८
२८ बुलढाणा ९१९२९ ९१०८४ ८२४ १५
२९ यवतमाळ ८१९७८ ८०१५८ १८१६
३० नागपूर ५७६३२७ ५६७०९४ ९१४३ ७१ १९
३१ वर्धा ६५६६३ ६४२५४ १२३७ १७१
३२ भंडारा ६७९३७ ६६७९४ ११३२ १०
३३ गोंदिया ४५४१५ ४४८२१ ५८०
३४ चंद्रपूर ९८८१३ ९७२१९ १५८८
३५ गडचिरोली ३६९६३ ३६२३० ६९१ ३४
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७८७२६६८ ७७२३७३७ १४३७६७ ४००५ ११५९

 

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत कोरोनाचे 78 लाख 72 हजार 668 रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंत एकूण 77 लाख 23 हजार 737 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 90 लाख 25 हजार 520 कोरोनी चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यातील 78 लाख 72 हजार 668 (09.96 टक्के) चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने अनेक जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत.


राजकीय आकसापोटी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतलाय- शरद पवार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -