Maharashtra Corona Update : राज्यात 1 हजार 635 कोरोनाबाधितांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update 1635 corona patient found in state 19 death
Maharashtra Corona Update : राज्यात 1 हजार 635 कोरोनाबाधितांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्या वेगाने घटत असल्यामुळे नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत फक्त 1 हजार 635 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 29 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आतापर्यंत लाखाच्या घरात गेला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात 4 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 76 लाख 91 हजार 064 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के झाले आहे. तर मुंबईतील कोरोनामुक्तांचा दर 98 टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात सध्या 2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1089 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यात सध्या 18 हजार 368 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यात 1 हजार 635 रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 78 लाख 56 हजार 994 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 1 लाख 43 हजार 576 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत 4456 ओमिक्रॉनबाधितांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण 4 हजार 456 ओमिक्रॉनबाधितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 3 हजार 768 रुग्णांचा आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. एकूण 8 हजार 904 चाचण्या करण्यात आल्या होत्या यातील 7 हजार 991 अहवाप प्राप्त झाले आहेत तर 913 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित राहिले आहेत.

मुंबईत 201 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 201 कोरोनाबाधितांची नोंद झआली आहे. त्यामधील 174 रुग्णांमध्ये लक्षणे आढळली नाहीत तर 26 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गेल्या 24 तासात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या ३ ते 4 दिवसांमध्ये मुंबईत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा दर वाढला असून तो आता 2870 दिवसांचा झाला आहे.


हेही वाचा : Rohit Sharma Test Captain: रोहित शर्मा कसोटी कर्णधार, उपकर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती