घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: रुग्णसंख्येत घट; ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत घट; ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

Subscribe

आज २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात २० हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, रविवारी हा आकडा कमी झाला. आज राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

२२ हजारहून अधिक रुग्ण बरे 

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

राज्यात ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -