घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात 8 हजार 695 रुग्णांची कोरोनावर मात, ३५...

Maharashtra Corona Update : राज्यात 8 हजार 695 रुग्णांची कोरोनावर मात, ३५ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात 2 हजार 831 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या संख्येने घट झाली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या घरात होता परंतु आता बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली असून ही महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 76,69,772 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात २ हजार 831 नव्या कोरोनाबाधितांसह एकूण 78 लाख 47 हजार 746 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 30 हजार 547 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून 97.73 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. आजपर्यंत एकूण 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 कोरोना चाचण्या केल्या असून 78 लाख 47 हजार 746 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

राज्यात ३५१ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात गेल्या २४ तासात 351 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात आलेल्या चाचण्या या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि बी जे वैज्ञानिक महाविद्यालयाने केल्या आहेत. राज्यात मुंबईत एकाही ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली नाही परंतु औरंगाबादमध्ये 148, नाशिक 111, पुणे मनपा 72, पुणे ग्रामीण 12 तर पिंपरी चिंचवडमध्ये 05, यवतमाळ 2 आणि साताऱ्यात 01 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 4 हजार 345 ओमिक्रॉनबाधितांनी नोंद झाली आहे. आजपर्यंत 3334 रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 7858 नमुन्यांचे आवाहन प्राप्त झाले आहेत. मात्र 1046 नमुने अद्याप प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.


हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटली, २४ तासातील कोरोना मृतांचा आकडा शून्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -