Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत सर्वाधिक घट! 24 तासांत 225 रुग्णांची वाढ, तर एकही मृत्यूची नोंद नाही

maharashtra corona update patients 222 discharged today 149 new cases in the state today
Corona Update : राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक; 149 नवे रुग्ण, 222 कोरोनामुक्त

मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस आधिकाधिक घट होताना दिसत आहे. आज देखील पहिल्यांदाच राज्यात सर्वात मोठी रुग्णसंख्येत घट झाली आहे. 18 एप्रिल 2020 पासूनची राज्यातील ही सर्वाधिक घट असलेली रुग्णसंख्या आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 225 नव्या कोरोनाबाधित आढळले असून एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी 2 मार्चला राज्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 38वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 740 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात 3 हजार 472 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

आज 461 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 17 हजार 823 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 83 लाख 14 हजार 109 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 38 (10.05 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 28 हजार 975 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

रविवारी राज्यात 362 नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर 688 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान देशात आज 4 हजार 362 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 9,620 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या देशात 54,118 इतकी झाली आहे.


हेही वाचा – होळीचा रंग रशिया-युक्रेन युद्धानं फिका; Refined Oil सह खाद्य तेलांचे दर वाढले