घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट ९२ टक्के पार

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट ९२ टक्के पार

Subscribe

राज्यात कोरोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. आज राज्यातील कोरोना रिकव्हरीचा रेट ९२ टक्के पार झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८७ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख ५३ हजार २२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये कोरोना मृत्यूचे प्रमाण जास्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘१० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ७ राज्यांमध्ये होत आहे. तर ६ राज्यांमध्ये ५ ते १० हजार दरम्यान रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ६ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत १,२९९ नव्या रुग्णांची नोंद; १,८२७ रुग्ण कोरोनामुक्त


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -