घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारांनी...

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारांनी वाढले, रुग्णसंख्या मात्र स्थिर

Subscribe

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोना मृतांची संख्या आज स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 2797 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 40 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्णसंख्येचा विचार केल्यास, काल 2748 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र आज कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आज 6383 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. हीच संख्या काल 5806 इतकी होती. (corona new patients)

आत्तापर्यंत कोरोनाचे 78,53,291 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 76, 81, 961 झाली आहे. तर अॅटिव्ह रुग्णांची संख्या आज 23,816 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज 40 कोरोना मृतांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 51 हजार 023 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत एकूण 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 कोरोना चाचण्या केल्या असून यातील 78 लाख 53 हजार 291 कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

राज्यात आज ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

राज्यात आज ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र राज्यात आजपर्यंत ओमिक्रॉनच्या एकूण 4456 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 3455 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 913 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -