घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात शनिवारी 27 हजारांहून अधिक कोरोनाबाधित तर अँक्टिव्ह रुग्णांची...

Maharashtra Corona Update: राज्यात शनिवारी 27 हजारांहून अधिक कोरोनाबाधित तर अँक्टिव्ह रुग्णांची संख्या वाचून बसेल धक्का

Subscribe

राज्याचा रिकव्हरी रेटही चांगला असून आज राज्यात 50,142 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.91टक्के इतका आहे.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हळू हळू कमी होऊ लागला आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवासांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज शनिवारी राज्यात 27,971 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या जरी कमी झाली असली तरी राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहून हैराण होण्याची वेळ येईल. राज्यात सध्या 2 लाख 44 हजार 344 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर आज एकूण 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोना मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही चांगला असून आज राज्यात 50,142 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.91टक्के इतका आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण देखील हळू हळू कमी होत असून आज राज्यात 85 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने रिपोर्ट केले आहेत. यात पुणे मनपा येथील 44 रुग्ण असून मुंबईतील 39 रुग्ण तर पुणे ग्रामीण आणि अकोला येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे.

राज्यातील अँक्टिव्ह रुग्ण  

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०४३५५२ १०१२०२४ १६६०२ २७३९ १२१८७
ठाणे ७५७९०५ ७२७२९१ ११७२४ ३५ १८८५५
पालघर १६१८८१ १५६११४ ३३७२ १५ २३८०
रायगड २४०३१५ २२८३३६ ४८७६ ७०९६
रत्नागिरी ८३५१४ ७९८९४ २५१५ ११००
सिंधुदुर्ग ५६४०१ ५३९२० १४८२ १५ ९८४
पुणे १३९८८९९ १३०२५८९ १९९६९ ३५० ७५९९१
सातारा २७२९१७ २५९६१५ ६५७१ ३३ ६६९८
सांगली २२३१५१ २१२९४९ ५६४५ ४५४८
१० कोल्हापूर २१७२९१ २०६९०५ ५८६५ ४५१६
११ सोलापूर २२३११२ २११९६३ ५६५६ ११३ ५३८०
१२ नाशिक ४६१८८९ ४३६००३ ८८१३ १७०७२
१३ अहमदनगर ३६४२१७ ३४६८९१ ७१८७ ११ १०१२८
१४ जळगाव १४७३२५ १४११०४ २७२१ ३३ ३४६७
१५ नंदूरबार ४४६५४ ४१७८८ ९५१ १९१२
१६ धुळे ४९६८८ ४७९७८ ६५८ ११ १०४१
१७ औरंगाबाद १७१३०९ १५९४४० ४२६७ १४ ७५८८
१८ जालना ६४९४३ ६१६३६ १२१९ २०८७
१९ बीड १०७६९३ १०३२४१ २८५१ १५९४
२० लातूर १०२५५२ ९६४८४ २४५७ ३६०५
२१ परभणी ५७३२५ ५३६६१ १२३७ २० २४०७
२२ हिंगोली २०४७१ १९०३२ ५०८ ९३०
२३ नांदेड १००७०७ ९५१३८ २६७० २८९२
२४ उस्मानाबाद ७३००२ ६९६६२ २००१ ११६ १२२३
२५ अमरावती १०२०४९ ९७४९८ १६०० २९४९
२६ अकोला ६४८५८ ६१५७२ १४३८ १८४४
२७ वाशिम ४३९५३ ४२१६८ ६३७ ११४५
२८ बुलढाणा ८८३०७ ८५००२ ८१४ २४८५
२९ यवतमाळ ८०१४२ ७६३४० १८०३ १९९५
३० नागपूर ५५५४३० ५१९१०९ ९१३० ७१ २७१२०
३१ वर्धा ६३१५५ ५८९२६ १२२५ १६५ २८३९
३२ भंडारा ६५४२४ ६१९७६ ११२७ १० २३११
३३ गोंदिया ४४२६६ ४२२२८ ५७५ १४५६
३४ चंद्रपूर ९७००९ ९२१४८ १५७१ ३२८६
३५ गडचिरोली ३४०७५ ३२१३५ ६७४ ३३ १२३३
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७६८३५२५ ७२९२७९१ १४२५२२ ३८६८ २४४३४४

हेही वाचा –  Mumbai Corona Update: मुंबईत शनिवारी 1,411 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 11 जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -