राज्यात मागील २४ तासांत २ हजार ८१३ रुग्णांची नोंद, तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

coronavirus

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या (Maharashtra Corona Update) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण राज्यात कोरोना रूग्णांचा (Corona Virus) आकडा दोन हजारांपेक्षा जास्त संख्येने वाढला आहे. राज्यात मागील २४ तासांत २ हजार ८१३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका कोरोना रूग्णाचा मृत्यू (Deaths) झाला आहे. राज्यातील मृत्यूदर (Death Rate) हा १.८७ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज एकूण १ हजार ४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७७,४२,१९० जण कोरोनामुक्त (Recovery) झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९८ टक्के इतके झाले आहे. राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण ११ हजार ५७१ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ…

मुंबईत (Mumbai) सर्वाधिक म्हणजे ७९९८ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर मागील २४ तासांत १७०२ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच मागील २४ तासात ७०३ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या १०४७६७५ इतकी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे.

मुंबईतील दुप्पटीचा दर हा ७३३ दिवस इतका आहे. तर कोविड वाढीचा दर २ जून ते ८ जून पर्यंत ०.०९३ टक्के इतका आहे. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये १ हजार ९८४ इतके रुग्ण सक्रिय आहेत.

देशात २४ तासांत ७ हजार २४० नवे रुग्ण

देशात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार २४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३२ हजार ४९० वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढत आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद