Maharashtra Corona Update: दिलासादायक ! राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये घट, तर २२९ नव्या रुग्णांचे निदान

आज राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजारांच्या घरात आली आहे. राज्यात आजच्या दिवशी एकूण १ हजार ९०६ सक्रिय रुग्ण आहेत. ज्यात मुंबईत ३२३ रुग्ण हे मुंबईतील असून १८९ रुग्ण हे ठाण्यातील आहेत.

Maharashtra Corona Update 323 new corona cases and Decrease in active patients in the state
Maharashtra Corona Update: दिलासादायक ! राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये घट, तर २२९ नव्या रुग्णांचे निदान

महाराष्ट्रात आज होळीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी राज्याला दिलासा देणारी आकडेवारी समोर आलीय. आज राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजारांच्या घरात आली आहे. राज्यात आजच्या दिवशी एकूण १ हजार ९०६ सक्रिय रुग्ण आहेत. ज्यात मुंबईत ३२३ रुग्ण हे मुंबईतील असून १८९ रुग्ण हे ठाण्यातील आहेत. पुण्यातील सक्रिय रुग्ण देखील कमी होऊन ७८१वर पोहोचले आहेत.

त्याचप्रमाणे आज राज्यात २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. कालच्या तुलनेच आजची संख्या कमी झाली आहे. काल राज्यात २३७ नवे रुग्ण आढळले होते. त्याचप्रमाणे आत राज्यातील मृत्यूसंख्या मात्र वाढली आहे. राज्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

तर राज्यात आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज ३९५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर काल हिच संख्या ४५५ इतकी होती. राज्यात आतापर्यंत ७७ लाख २२ हजार ३६० रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेटही ९८ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही.

राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याने राज्यात यंदा मोठ्या उत्साहाने होळी साजरी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी आपली योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – HOLI : विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर, यंदाची होळी निर्बंधमुक्त, सुधारित नियमावली जारी